कोरोना आणि रूढ़ि परंपरा

आज जिकडे पहावे तिकडे फक्त आणि फक्त एकच गोष्ट पाहायला ऐकायला येत आहे आणि ती म्हणजे जगभरात सुरु असलेला कोरोनाचा (COVID-19 coronavirus) थैमान. चीनच्या वुहान या शहरात सुरु झालेला हा व्हायरस (virus) रूपी आजार आज जवळ पास जगभरात पोहचला असून भारत ही त्याला अपवाद नाही.
        हळूहळू बरेच असे घळत गेल जे पहिल्यांदा घळत होत. पूर्ण जगच धावायच बंद झाल. कोरोना भारतात आला आणि जे बऱ्याच पिढ्यांनी पाहिल नव्होत ते आज पहायला मिळाल. जसेकि आपन सुरुवातीला पहिल की अनेक मंदिरे बंद करन्याय आली जी वर्षानु वर्ष कधीच बंद केली नव्होती. सोबतच अनेक परंपरागत चालत असलेल्या यात्रा, अनेक वेगवेगळे उत्सव जे पिढ्यांन पिढ्यां चालत होते ते आज कोरोनाने बंद आहेत. सध्या आपण लग्नही अगदी साध्या पद्धतीने होतांना पाहतोय अगदी नवरदेव नवरी आणि ४-४ लोक दोघांन कड़चे.
          बऱ्याच लोकांनी या काळात अनेक गरजू लोकांना मदत ही केली. अनेक होम हवन करुण जे समाधान लाभल नाही ते हया मदत केल्याने अनेकांना लाभल. हे सर्व पाहुन मनात विचार आला की किती सोप्प आहे परपंरा ज्या पिढ्यां न पिढ्यां चालत होत्या त्या बदलन. पिढ्यां न पिढ्यां चालत असलेल्या प्रथा, रूढी, परंपरा आजही समाजात जपल्या जातात. त्या जपायलाही हरकत नाही, पण त्यामागचं कारण अगोदर समजून घेतलं पाहिजे, परिस्थितीनुसार त्यात बदल करून त्याचा अवलंब करणं आवश्यक आहे. पण रूढीचं पालन आंधळेपणाने करण्याची सवय लोकांना लागली आहे, यात अशिक्षितच नाही तर बरेच लोक सुशिक्षितही आहेत..
      आज माणसाने स्वतःच्या हितासाठी मंदिरे बंद केली. लग्न साध्या पद्धतीने केली म्हणजे नेमक काय केल तर त्या परंपरांना स्वतःच्या सोइ साठी बदलल्या. माझ हे मुळीच म्हणणे नाही की मंदिर बंदच राहु दया, लग्नात कोणाला बोलवु नका, खर्च करु नका म्हणून. ज्याला शक्य आहे त्याने जरूर करा.
       मान्य आहे मला भारतात अनेक परंपरा आहेत ज्या खरोखर चांगल्या व शास्रीय आहेत, पण काय हरकत आहे भविष्यात जर एखादी बुरसटलेली, कालबाह्य समाजाला नको असलेली पण केवळ परंपरेच्या नावाखाली चाललेल्या रूढि परंपरा बदलायला. एखादया कड़े नसतील लग्नात पैसे उधडायला, केल त्याने आज होत असलेल्या लग्नान सारखे लग्न तर काय फरक पडतो? पण लोक त्याला लगेच नाव ठेवून मोकडे होतील, त्याच्या परिस्थितिचा कुणीही विचार करणार नाही.
      होतच आहेत ना आजही लग्न, अंत्यविधी, दशक्रिया, वाढदिवस. की कुणाच्या न आल्याने लग्न झाल नाही?, भटजी, बुवा आला नाही म्हणून अंत्यविधी, दशक्रिया झाली नाही?, की केक मिळाला नाही म्हणून वाढदिवस साजरा करता आला नाही?, नाही ना, केल ना हे सगळ स्वतःच्या सोइनुसार लोकांनी, आणि पुढेही करायला काय हरकत आहे. परंपरा कशी मोडायची असे मानणाऱ्या लोकांनी आज खरच त्यावर विचार करायला हवा, की परंपरा मोडल्या, बदललेल्या तर काही आभाळ कोसळत नाही म्हणून. शेवटी काळानुसार रूढी-परंपरांमध्ये बदल आवश्‍यक आहेच.
(मनोज पाटील)


1 comment: