तुझ्या मनाने माझ्या मनावर,
प्रेमाचे जाळे टाकायल नको होते.
तुझ्या मनाने माझ्या मनाला,
अशी भुरळ घालायला नको होते.
त्यात माझ्या मनानेही असे,
नकळत अळकायला नको होते.
तू माझ्या कड़े असे पहायला नको होते !
तुझ्या डोळ्यानी माझ्या डोळ्यांशी
असे बोलायला नको होते.
त्यात अश्या प्रेमाच्या गोष्टी,
करायला नको होते.
त्या प्रेमाच्या गोष्टीन मध्ये,
मीहि असे हरवायला नको होते.
तू माझ्या कड़े असे पहायला नको होते !
प्रेये तू ही असे जवळ माझ्या,
यायला नको होते.
जवळ येऊन तुही माझ्याशी
प्रेमाच्या गोष्टी करायला नको होते.
त्या प्रेमाच्या गोष्टीने,
तू मला आणि माझ्या मनाला,
आपलेसे करायला नको होते.
तू माझ्या कड़े असे पहायला नको होते !
अश्या ह्या प्रेमाच्या वाटेवर,
तू मध्येच साथ सोडायल नको होते,
प्रेमाच्या ह्या वाटेवर,
विरहाचे दुःख दयायल नको होते.
तू माझ्या कड़े असे पहायला नको होते !
✍🏻 मनोज पाटील