Online बिनलाइन


     इंटरनेट आणि स्मार्टफ़ोन च्या जमान्यात सर्व काहि शक्य झाले आहे. कपड़े, मोबाइल, घरातील वस्तुंन पासून तर रोज लागणार दूध, किराना ही आपण घर बसल्या ऑनलाइन मागउ शकतो. एवढच काय तर आज काल Zomato, Swiggy सारख्या अनेक e-commerce App वरुण जेवण ही मागउ शकतो. हे खर तर उपयोगी ही खुप आहे, आणि वेळ ही खुप वाचतो, पण खरच या धावपळीच्या जीवनातून वाचवलेला वेळ आपण उपयोगात आणतो का ? किती लोक आपल्या परिवारा सोबत वेळ घालवतात ? आधी घरातील साधा किराना करायचे म्हटले तरी तालुक्याच्या गावी नाहीतर एखाद्या बाजार पेठेच्या गावी जावे लागत होते असे आपले आजी-आजोबा आपल्याला सांगतात, आणि ते खरही आहे. ते ही अगदी बस च्या वेळेनुसार. आज हे सगळ घरबसल्या, गांवातच मिळत. शिवाय वेळ ही वाचतो. पन एवळ असुनही काय उपयोग ज्याला विचाराव तो वेळच नाही मिळत सांगतांना दिसतो.

     आधी TV हा फार कमी लोकांनकड़े असायचा. तिथेच सगळी लहान मुल TV पाहायला जायची. आणि Light गेली की सगळे कल्लोळ करत घरा बाहेर पाळायचे आणि दूसरे काहितरी करमनुकीके साधन शोधायचे. स्मार्ट फ़ोन आल्यापसुन करमनुकी ची साधन शोधायची गरज जनु कुणाल भासतच नाही. जूने खेळ ही सगळे कालबाह्य झाले. स्मार्ट फ़ोन ने ही पिढी गरजे पेक्षाही स्मार्ट होतांना दिसत आहे. प्रेत्यकाचे स्वतःचेच एक ऑनलाइन विश्व (Whatsapp, Facebook, Instagram etc.) तयार करुण ठेवले आहे, त्याला आता आपणही अपवाद नाही. म्हणूनच की काय तर अगदी मांडी ला मांडी लाउन बसलेला एखादा मित्र मोबाइल मधून एखादा चांगला विनोद वाचून न दाखवता तो सरळ व्हाट्सएप वर पाठवन्यात धन्यता मानतो. मग प्रश्न पडतो काय उपयोग अश्या गोष्टीचा ज्या सांगायला एकमेकांना जोडतात, पन प्रत्यक्षात तस आहे का ?
यात दोष स्मार्टफोन इंटरनेट वा e-commerce सारख्या साईट चा नसून लोकांच्या मानसिकतेचा आहे.

आणि शेवटी एवढच म्हणावेसे वाटत.

तुम भी गर्दन उठाकर जी सकते हो दुनिया में…
बस एक बार मोबाइल घर पर ही भूल जाना !!





शाळा

       आज सकाळी ऑफिस जातांना रस्त्याच्या कडने उभे असलेली शाळेत जाणारी मूल पाहिली, लहान लहान  पाठीवर भली मोठी बॅग, भली मोठी काय तर चांगलीच त्या मुलांच्या निम्या वजनाची असावी. त्यात पाण्याची बॉटल अजुन भर घालत होती. पावसाचे दिवस असल्याने कहिंकड़े रंगेबीरंगी छत्री तर कहिंकडे छानसे रेनकोट होते.
      हे सगळ पाहिल्यावर मला माझ्या शाळेची आठवण आली. आमच्या कड़े असे भले मोठे ओझ (दप्तर) नसायचे. पाटी पेन्सिल, उजळनिचे आणि बालभारती चे पुस्तक आमच्या पिशवित असायचे. काही मुलांकडे दगडाची पाटी असायची तर कहींकडे पुठ्याची वरुण काळा कलर केलेली पाटी असायची. जी जास्त ओली केली की नरम व्हायची. हळूहळू पुढच्या इयत्येत गेल्यावर दप्तर आल, एक दोन पुस्तक आली पेन्सिल खोडरबर आणि पेन आमच्या दप्तरात आले. पन त्या पाटीवर जी लिहिण्यात मज्या होतीं ती आता पेन्सिलीने वहीवर लिहिण्यात नाही. मी तर म्हणेल ती मज्या अगदी लॅपटॉप, कंप्यूटर च्या कीबोर्ड वर ही नाही. सहज झालेली चूक पुसून दुरुस्त करता येत होती. अश्याच चुका जर जीवनाच्या पाटीवरच्या दुरुस्त करता आल्या असत्या तर ?
      पावसाळ्यात रेनकोट तर नसायचेच पन असलिच तर एखाद्या कड़े लांब दांडा असलेली छत्री असायची जी हाताळायला एक वेगळीच कसरत करावी लागत असे. बरेच मूल खताची गोणी नाहीतर प्लास्टिकच्या मोठ्या पिशविचि घोंगडी करुण मोठ्या रुबाबत शाळेत येत असत. शाळेत जातांना खाऊ म्हणून खिशात शेंगदाने, कुरडाई, वड़े, खारे गहु, आणि फूटाने असायचे. त्याची सर आजकाल च्या बिस्किट केक सारख्या खाऊ ला येणार नाही.
         शाळा सुटल्यावर आम्ही सगळे मित्र मनसोक्त खेळायचो, पावसाळ्यात तर जसे घरुण निघायचो तसेच घरी गेलो तर नवलच, कारण चिखल माती चे कपड़े नविनच रंगून निघायचे. शाळा सुटल्यावर तस कामच काय असायच आम्हाला, मनसोक्त खेळायच आणि अगदी पावल मोजत घरी जायच. गृहपाठ नावाचा प्रकार मला तरी मी शाळेत असतांना आठवत नाही. आज काल च्या मुलांचे गृहपाठ आणि प्रोजेक्ट ऐकले तर आश्चर्यच  वाटते, आणि प्रश्न पडतो या वयात यांना हे खरच पेलवत असेल का ? आणि त्या हुन महत्वाचे म्हणजे खरच या वयात या सगडया होमवर्क, प्रोजेक्ट सारख्या प्रकारची गरज आहे का ? शाळेत केलेला अभ्यास पुरेसा नसेल का? असो ही भारतीय शिक्षणाची पद्धत आहे ! त्यात अजुन भर ती शाळा सुटल्यावर खाजगी शिकवण्यांची, ते लहान लहान मूल खेळनार कधी घरच्यांसोबत मिसळनार कधी. या साठी त्यांना वेळ कुठे आहे, आणि मिळालाच वेळ तर हल्लीची मूल TV वर कार्टून पाहण्यात तो घालवतात.
        मग मनात विचार येतो, शिक्षण म्हणजे केवळ डिग्री चा एक कागद असतो , खर शिक्षण तर तुमच्या संस्कारातून माणुसकीतून दिसत असत. आणि त्याचीच खरी गरज आहे, कारण चांगले संस्कार हे अवयवान पेक्षा काही कमी नाहीत.

पाऊस..... पहिला पाऊस..!!

पाऊस आणि तोहि पहिला पाऊस असला तर क्या बात है..!!

         आपल्याला पहिल्या असलेल्या प्रत्येक गोष्ठि नेहमीच स्मरणात राहतात, जसे पहिले प्रेम, पहिली भेट, पहिला मित्र/मैत्रीण, पहिली शाळा/कॉलेज, पहिला वर्ग आणि बरेच काही, तसाच प्रत्येक पावसाळ्यातला पहिला पाऊसही नेहमीच स्मरणात राहणारा असतो. या पहिल्या पावसा सोबत बऱ्याच जुन्या आठवणी ताज्या होतात आणि मन प्रसन्न होत .
            उन्हानें तापलेल्या जमिनीवर जेव्हा हा आतुरतेने वाट पाहायला लावनारा पाऊस पडतो तेव्हा त्या जामिनितुन जो मृदुगंध येतो त्याची सर जगातील भारीतल्या भारी परफ्यूम ला येणार नाही. असा हा पहिला पाऊस येतो आणि हळू हळू सर्व कही बदलून टाकतो, निसर्ग हा सर्विकड़े हिर्वागार होतो, सर्वीकडे गारवा होतो, त्याच सोबत प्रत्येकाचे मन ही ह्या पावसाने सुखावले जातात आणि मनात जपलेल्या काही आठवणीही हिरव्या होतात.
          हाच तो ऋतु असतो ज्याची सर्वजन आतुरतेने वाट पाहत असतात. कुणाला मित्रांन सोबत दूर डोंगर पायथ्याशी फिरायला जायचे असते तर कुणाल प्रियसीला घेऊन घाटाच्या वळणदार रस्त्याने फिरायला जायचे असते. काहींना फक्त खिड़कित बसून हातात चहा चा कप घेऊन पाऊस अनुभवायचा असतो तर काहींना या पावसात ओलंचिंब भिजायचे असते. मलाही पहिल्या पावसात हातातल सगळ काम सोडून पावसात जाऊन उभ रहाव आणि मनसोक्त भिजावस वाटत जसे लहानपणी भिजायचो, पन आता हा अनुभव घ्यायला आपन लहान नाही अशी जाणीव हातातल काम मला करुण देत असत, बहूदा माझ्या सारखीच जाणीव बऱ्याच जणांना होत असावी. प्रत्येकजन आपआपल्या पद्धतीने पावसाचा अनुभव घेत असतो, आणि घ्यायलाच पाहिजे. हाच तो ऋतु आहे जो आपल्याला लहानपणीच्या दिवसांची आठवन करुण देतो. पावसात भिजणे, चिखलात खेळने, डाबक्याच्या पाण्यात खेळने, शाळेतुन येतांना छत्री सोबत असूनहि भिजणे, भिजलेल्या ओल्या मातीची खेळणी बनवणे, पाण्याच्या  वाहत्या प्रवाहात कागदाची नाव बनवून सोडणे खरंच किती सुंदर आणि वेगळे असतातना ते दिवस !
        या दिवसात खिडकीत चहा नाहीतर कॉफी चा कप हातात घेऊन बसलेले कवीला कविता सुचतात, चित्रकाराला छान चित्र काढावेसे वाटतात तर लेखकाची लेखणी वाऱ्यासारखी बोलू लागते. प्रियकराला प्रियसीच्या आठवणीत प्रेमावर शायरी करावीशी वाटते तर प्रियसीला आपल्या प्रियकराला चोरून पाहावेसे वाटते. असा हा प्रेमाचा पाऊस सगड्यांना प्रेमाने मोहून टाकणारा असतो.म्हणूनच सगळे ह्या पहिल्या पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात.
        जेव्हा हा पहिला पाऊस येतो तेव्हा नकळतच ओठांवरती गाणे गुणगुणले जाते.

भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची ।।
नावगाव टाकुनि आली अशी तुझी प्रीती
तुला परी जाणिव नव्हती तुझ्या साहसाची ।।
  स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास  
सुखालाहि भोवळ आली मधुर सुवासाची ।।

Kanda Bhaji

मातितल बालपण आणि बालपणातलं गावं ....

गांव आणि गावतल बालपण खरच एक वेगळाच अनुभव असतो,
गावातुन नोकरी आणि व्यवसाया निम्मित शहरात आलेल्या प्रत्येकाला ते हुबेहुब आठवत असत, प्रत्येकाला ते गावतले लहानपणीचे खेळ मित्र व ठराविक ठिकान  हें नक्कीच आठवतात आणि नकळत चेहऱ्यावर हसू आणि डोळे ओले होतात.
         अगदी कोणत्याच गोष्टिला सीमा नसलेल बालपण जर का कुठे असेल तर ते गावातच. शाहरातल्या लहान मुलांचे लहानपण पाहुन मनोमन देवाचे आभार मानावेसे वाटतात, कारण आम्ही जे जगलो ते बालपण हया शाहरतल्या बालपणाहुन कितीतरी चांगले आणि मजेशिर होत. शहरात बालपण विकत घ्यावे लगते, Video games, Swimming class  आणि फिरायल महागडी Garden पावला-पावला वर पैसा देऊन आंनद विकत घेण्याची कसरत चाललेली असते. है चार भिंतितल लाहनपन कस बर आठवेल या मुलांना, बर आठवले तरी काय तर मोबाईल मधले खेळ नाही तर सुट्टीच्या दिवशी Garden आणि Hotel मध्ये घालवलेला दिवस.
पन गावाकडच्या मुलांन कड़े शेतात घालवलेल्या दिवसांन पासून तर अगदी ढोपर-कोपर फूटे पर्यंत खेळलेले खेळ आठवतात. बर खेळ ही एक दोन नाही तर प्रत्येक ऋतू प्रमाणे बदलनारे खेळ. हल्ली बरेच खेळ गांवातुनही मोबाईल मुळे हद्दपार झाले व काही होण्याच्या वाटेवरती आहेत. पन मला आठवत की गावकडे अगदी साबरीला येणाऱ्या म्हशी (साबरीच्या झाळाची पाने) ज्वारी च्या तोट्यान पासून बनवलेलि खेळणी, मातीची खेळणी आणि सायकल चा जूना टायरही अगदी आनंदाने खेळायचे.

              उन्हाळ्याच्या सुट्टीत तर भवरा, गोट्या  व क्रिकेट खेळण्याची धूम असायची. उन्हाळ्यात शाळेला सुट्टी लागली की घरातल्यान बरोबर गांव गल्लीच्या लोकांना संकट पडायच. त्यांना माहित होत कारण आता काय ही पोर कुणाचे ऐकायचे नाहीत म्हणून, अगदी उन्हाचे ही नाही. भर दुफारी उन्हात फक्त मुलांचाच गोंधळ गल्लीत असायचा, यातच गल्लीतल्या एखाद्या वयोवृद्ध वा प्रतिष्ठित व्यक्तिची ओरड़ ही पडायची पन त्याचा आम्हाला कसला कमीपना किवा फरक पडत नव्होत. आणि पडलाच फरक तर फार फार गल्ली बदलायची, मूल ही तीच आणि खेळ ही तोच फक्त दुसर्या गल्लीत जाऊन खेळायचा.
          पन शहरात मात्र सगळ वेगळेच पाहायला मिळत, येथे आई वडिलांना शाळा सुरु झाल्या की चिंता पड़ते की आता रोज काहिना काही शाळेचा गृहपाठ येणार आणि तो बिचार्या आई वडिलांना करावा लागणार. दर महिन्याला पालक सभा, आणि Projects च्या नावाखाली बरेच काही. आणि सुट्टी लागली की यापासून सुटका होत नाही तोवर मुलांचा प्रश्न आई मी काय करु ? पप्पा मी काय खेळू ? कुठे जाऊ ?  पन गावात मूल कुठे गेली काय खेळतायत याची चिंता आई वडिलांना कधीच नव्होती. याचा अर्थ असा मुळीच नाही की त्यांना त्यांच्या मुलांची काळजी नव्होती म्हणून, पन त्यांना माहित होत की ये गावतच कुठे न कुठे खेळत असेल म्हणून. आई मात्र जेवनाची वेळ चुकली की जेवना सोबत शिव्या पन खाउ घालायची. आणि शाळेची तर चिंताच सोळा, त्यांना आपली पोर पुड़च्या वर्गात गेले अस तेव्हा कळायच जेव्हा ते नवीन वह्या, पुस्तक किंवा नवीन दप्तर मागायचे.

खरच किती  सुंदर होत ना ते गांव आणि गावतल बालपण ......!!

स्वप्न



एखाद स्वप्न पाहन , ते फुलवन , 

ते सत्यात उतरावं म्हणून धडपडन , 

त्या धडपडीतला आनंद लुटन आणि 

दुर्द्यवाने ते स्वप्न भंग पावलं , 

तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या 

पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावण, 

हा मानवी जीवनाचा धर्म आहे. 

मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो , 
तो यामुळेच ! ”
– वी . स. खांडेकर