शाळा

       आज सकाळी ऑफिस जातांना रस्त्याच्या कडने उभे असलेली शाळेत जाणारी मूल पाहिली, लहान लहान  पाठीवर भली मोठी बॅग, भली मोठी काय तर चांगलीच त्या मुलांच्या निम्या वजनाची असावी. त्यात पाण्याची बॉटल अजुन भर घालत होती. पावसाचे दिवस असल्याने कहिंकड़े रंगेबीरंगी छत्री तर कहिंकडे छानसे रेनकोट होते.
      हे सगळ पाहिल्यावर मला माझ्या शाळेची आठवण आली. आमच्या कड़े असे भले मोठे ओझ (दप्तर) नसायचे. पाटी पेन्सिल, उजळनिचे आणि बालभारती चे पुस्तक आमच्या पिशवित असायचे. काही मुलांकडे दगडाची पाटी असायची तर कहींकडे पुठ्याची वरुण काळा कलर केलेली पाटी असायची. जी जास्त ओली केली की नरम व्हायची. हळूहळू पुढच्या इयत्येत गेल्यावर दप्तर आल, एक दोन पुस्तक आली पेन्सिल खोडरबर आणि पेन आमच्या दप्तरात आले. पन त्या पाटीवर जी लिहिण्यात मज्या होतीं ती आता पेन्सिलीने वहीवर लिहिण्यात नाही. मी तर म्हणेल ती मज्या अगदी लॅपटॉप, कंप्यूटर च्या कीबोर्ड वर ही नाही. सहज झालेली चूक पुसून दुरुस्त करता येत होती. अश्याच चुका जर जीवनाच्या पाटीवरच्या दुरुस्त करता आल्या असत्या तर ?
      पावसाळ्यात रेनकोट तर नसायचेच पन असलिच तर एखाद्या कड़े लांब दांडा असलेली छत्री असायची जी हाताळायला एक वेगळीच कसरत करावी लागत असे. बरेच मूल खताची गोणी नाहीतर प्लास्टिकच्या मोठ्या पिशविचि घोंगडी करुण मोठ्या रुबाबत शाळेत येत असत. शाळेत जातांना खाऊ म्हणून खिशात शेंगदाने, कुरडाई, वड़े, खारे गहु, आणि फूटाने असायचे. त्याची सर आजकाल च्या बिस्किट केक सारख्या खाऊ ला येणार नाही.
         शाळा सुटल्यावर आम्ही सगळे मित्र मनसोक्त खेळायचो, पावसाळ्यात तर जसे घरुण निघायचो तसेच घरी गेलो तर नवलच, कारण चिखल माती चे कपड़े नविनच रंगून निघायचे. शाळा सुटल्यावर तस कामच काय असायच आम्हाला, मनसोक्त खेळायच आणि अगदी पावल मोजत घरी जायच. गृहपाठ नावाचा प्रकार मला तरी मी शाळेत असतांना आठवत नाही. आज काल च्या मुलांचे गृहपाठ आणि प्रोजेक्ट ऐकले तर आश्चर्यच  वाटते, आणि प्रश्न पडतो या वयात यांना हे खरच पेलवत असेल का ? आणि त्या हुन महत्वाचे म्हणजे खरच या वयात या सगडया होमवर्क, प्रोजेक्ट सारख्या प्रकारची गरज आहे का ? शाळेत केलेला अभ्यास पुरेसा नसेल का? असो ही भारतीय शिक्षणाची पद्धत आहे ! त्यात अजुन भर ती शाळा सुटल्यावर खाजगी शिकवण्यांची, ते लहान लहान मूल खेळनार कधी घरच्यांसोबत मिसळनार कधी. या साठी त्यांना वेळ कुठे आहे, आणि मिळालाच वेळ तर हल्लीची मूल TV वर कार्टून पाहण्यात तो घालवतात.
        मग मनात विचार येतो, शिक्षण म्हणजे केवळ डिग्री चा एक कागद असतो , खर शिक्षण तर तुमच्या संस्कारातून माणुसकीतून दिसत असत. आणि त्याचीच खरी गरज आहे, कारण चांगले संस्कार हे अवयवान पेक्षा काही कमी नाहीत.

No comments:

Post a Comment